शबनम न्युज | बारामती
बारामती लोकसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली आहे. विजय शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे निश्चित केले असून, आपण येत्या 12 तारखेला दुपारी 12 वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, “मी 12 एप्रिल रोजी 12 वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे 12वाजवणार आहे.” अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. तसेच “मतदारसंघात मला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, माझाच विजय होणारच” असाही विश्वास यावेळी शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. ते पुरंदर मधील प्रमुख कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.
Advertisement