शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
मावळ मधून कामगारांच्या प्रतिनिधीला संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिका आघाडीच्या वतीने भाजपला करण्यात आली आहे. मावळ मधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटला असल्याचे सांगितले जात असतानाच आता भाजपची संलग्न असलेल्या राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कामगारांच्या प्रतिनिधीला संधी देण्याची मागणी केली आहे, सदर आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी ही मागणी केली आहे, त्यामुळे महायुतीचा तिढा सुटण्याच्या मार्गावर असलेला तिढा आता पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिंपरी चिंचवड, तळेगाव, उरण, पनवेल या भागात मोठे उद्योग असून कामगार वर्ग मोठा आहे. श्रमिकांना प्रतिनिधित्व द्यावे, मावळची जागा भाजपने घ्यावी आणि आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत भोसले म्हणाले की, राज्यात 60 ते 70 टक्के कामगार आहेत. तो संघटित आहे. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आवाज उठविण्यासाठी श्रमिकांचा लोकसभेत प्रतिनिधी असावा, अशी कामगारांची भावना आहे.