शबनम न्युज | पुणे
लोकसभा निवडणुकीचे वारे फिरत असतानाच आज याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. महायुतीत आमचे 48 आमदार उभे राहणार आहेत, अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली. तसेच लोकसभा निवडणुकीत काय रणनीती असेल या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी देखील संवाद साधला.
पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, आमची आमदारांची बैठक झाली. आम्ही एकत्र चर्चा करून महायुतीच्या 48 जागांबद्दल महाराष्ट्रात कोणी? कुठे? जागा लढवायच्या त्याचे 80 टक्के काम झाले आहे. आता मी सांगतो की 99% जागा वाटपाचे काम फायनल झाले आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी उमेदवार दिले आहेत. आज मी पहिली जागा जाहीर करतो. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.
तसेच मुख्य पक्ष आणि घटक पक्ष मिळून 48 जागा लढवत आहोत. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आज पक्षप्रवेश होणार आहे. तो प्रवेश झाल्यानंतर दुसरी जागा मी तिथे जाहीर करेल. बाकी जागा 48 मार्चला तुम्हाला महायुतीच्या जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.