शबनम न्युज | आकुर्डी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी श्री.दिपक सिंगला आणि सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्री.विठ्ठल जोशी, २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक १६/०४/२०२४ दुपारी ११:३० वाजता डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिरिंग, आकुर्डी येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी विद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रमोद चौगुले, श्रीम. शरयू वासू, श्री. शेखर वाघमोडे, श्री.विशाल सुरवदे , श्रीम.उत्कर्षा खराडे व डॉ. गणेश गोसावी तसेच २०५ चिंचवड विधानसभा मतदार संघ स्वीप व्यवस्थापन टीम यावेळी येथे उपस्थित होते. यावेळी २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघ श्री. संतोष अवधूत व श्री. प्रकाश गोडके EVM Trainer, तसेच स्वीप टिमचे नोडल अधिकारी श्री. राजाराम सरगर व स्वीप टिम यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली.
डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिरिंग येथील सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करण्यात आली. यामध्ये शिक्षक व विद्यार्थ्यामार्फत मतदारांना मतदान करण्यासाठी एक उत्साह मिळाला तसेच “ देशहितासाठी मतदान करा, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो, वोट देणे जाना है देश को आगे बढाना है ” असा संदेश देण्यात आला. यानंतर विद्यार्थी आणि शिक्षक यांचेकडून मतदान प्रतिज्ञा म्हणून घेणेत आली. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यामार्फत मतदान जनजागृतीपर नाट्य सादर करण्यात आले तसेच विविध प्रकारची फलके, घोषवाक्ये यांमधुन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत नागरिकांकडून देखील उस्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे.