शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ फेब्रुवारी) :- राष्ट्रवादी काँग्रेस चे एकनिष्ठ कार्यकर्ते व पिंपरी चिंचवड शहराचे नवनिर्वाचित युवा अध्यक्ष इम्रान शेख यांची दिनांक- २४/०२/२०२२ रोजी पार्थ पवार यांच्याशी भेट झाली. इम्रान शेख यांचे पुष्पगुच्छ देऊन आजवर केलेल्या कामाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या , सदर वेळी गोविंद पानसरें याचे लिखित “शिवाजी कोण होता” हे पुस्तक देऊन इम्रानभाई शेख यांनी पार्थ पवार यांचे आभार व्यक्त केले.
सदर वेळी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या ” चाले जाओ भाजप “मोर्चावर चर्चा रंगली आणि पार्थ पवार यांनी सदर मोर्चाचा आढावा घेतला व नवनिर्वाचित अध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे,समनव्ययक योगेश बहल आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणीचे कौतुक केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आगामी निवडणुकीत “अब कि बार सौ पार” हे ध्येय राष्ट्रवादी काँग्रेस कसे पूर्ण करणार याचा भविष्य आराखडा दाखवण्यात आला आणि या विषयावर बऱ्याच वेळ चर्चा केल्यावर आराखडा निश्चित करण्यात आला आणि त्यानंतर “अब कि बार सौ पार” करण्यामध्ये शहरातील युवकांचा खारीचा वाट असेल असे कौतुकास्पद उच्चर पार्थ पवार यांनी त्यांनी काढले.
या वेळी पिंपरी चिंचवड मधील युवकांसाठी पार्थ पवार यांनी इम्रानभाई शेख यांचं कडे एक संदेश पाठवला आहे ,ते म्हणाले कि,”पिंपरी चिंचवड च्या युवकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे. भाजपा ने केलेल्या भ्रष्ट कारभाराविरोधात भविष्यात अजून ताकदीने संघर्ष उभा करणार आहे आणि भ्रष्ट भाजपचा कारभार युवकांच्या माध्यमातून जनते समोर आणणार आहे.”