शिवजयंती आणि स्वातंत्रवीर सावरकर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित शिबीराचे आयोजन
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२८ फेब्रुवारी) :- शिवजयंती आणि स्वातंत्रवीर सावरकर आणि खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित भव्य आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले ,डोळे फाउंडेशन ,आयकॉन डायगणोस्टिक ,चाकण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने किरण ज्ञानेश्वर दळवी यांनी मोफत सर्व रोग तपासणी उपचार आणि रक्तदान करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे ,जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर ,शिवसेना संपर्कप्रमुख पिं.चिं. वैभव थोरात,शिवसेना जिल्ह्याप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहर संघटक संतोष सौंदणकर, वाबळे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वांनी शिबिराचे कौतुक केले आणि समाजातील आरोग्य शिबिराची गरज याबद्दल महत्व सांगितले ,कार्यक्रमाचे आयोजक किरण दळवी शिवसेना विभाग प्रमुख ,यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले आणि प्रभागातील नागरिकांना आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री हुले सर यांनी केले किरण दळवी मित्र परिवार यांनी कार्यक्रमा साठी परिश्रम घेतले.
या शिबिरात 213 नागरिकांनी डोळे तपासणी केली त्यात काही लोकांना मोतीबिंदू सांगितले त्यात उध्या 6 लोकांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन्स होणार आहे,58 लोकांनी रक्तदान केले तसेच इ सी जी ,नेत्र तपासणी,बी पि ,शुगर ,हिमोग्लोबिन, अश्या अनेक तपासण्या करण्यात आली 530 नावरीकांनी शिबिरात सहभाग घेतला ,हिमाचल येथे झालेल्या कुडो कराटे स्पर्धेतील प्राविण्य मिळवलेल्य खेळाडूंचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.