करियर मार्गदर्शन व्याख्यान चे आयोजन
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार समारंभ तसेच करियर मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रम नुकताच माजी नगरसेवक सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांच्या वतीने थेरगाव मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी हा सन्मान करण्यात आला असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
या कार्यक्रमात गणेश शिंदे प्रसिद्ध कीर्तनकार समाज प्रबोधनकार यांनी मार्गदर्शन केले संपन्न झाला थेरगाव मधील सोनाई मंगल कार्यालय येथे ७ ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती शंकर शेठ जगताप तसेच पोलीस निरीक्षक वाकड पोलीस स्टेशन सत्यवान माने यांच्यासह माजी नगरसेविका जमाताई बारणे माजी नगरसेवक मनोहर अण्णा पवार माजी नगरसेवक कैलास बारणे माजी नगरसेविका मनीषाताई बारणे माजी नगरसेवक अभिषेक बारणे भाजपचे उपाध्यक्ष काळूराम बारणे यांच्यासह महिला अध्यक्ष मराठा महासंघ पिंपरी चिंचवड शहर विजयाताई देशमुख भाजप नेते तानाजी भाऊ बारणे माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे प्रज्ञा शिक्षण संस्थेच्या सचिव भारतीय गवळी सरस्वती क्लासेसचे महेंद्र शिखरे उद्योजक नितीन आप्पा बारणे भाजप महिला आघाडीच्या करिष्मा ताई सनी बारणे सामाजिक कार्यकर्ते जयदीप माने सामाजिक कार्यकर्ते दिलीप परदेशी सामाजिक कार्यकर्त्या मेघाताई जोशी पोलीस मित्र संघटनेचे कार्याध्यक्ष शहाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्व उपस्थितांचे सिद्धेश्वर बारणे यांनी आभार व्यक्त केले.