शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाच्या कार्यालयासाठी जागेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करा, अशी मागणी महाराष्ट्र माथाडी श्रमजीवी कामगार जनरल युनियनचे अध्यक्ष सुरज बाबर यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पिंपरी चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे कार्यक्षेत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र, तसेच जुन्नर, आंबेगाव, राजगुरुनगर,मावळव मुळशी तालुका असे आहे, मंडळाची स्थापना सन 1992 मध्ये झालेलीआहे.मंडळामध्ये एकूण 2050 मालक नोंदीत असून 6000 एवढे प्रात्यक्ष माथाडी कामगार कार्यरत आहेत.सध्या मंडळाचे कार्यालय गूलनूर बिल्डींग 2रा मजला, चिंचवड रेल्वे मालधाक्याजवळ, पिंपरी पुणे 19 येथे आहे.
सध्या स्थितीमध्ये हे मंडळ त्रीसदस्यीय स्वरूपाचे दिनांक 01/04/2022 व दिनांक 20/05/2022 रोजीच्या मंडळाचे बैठकीमध्ये मंडळाचे मुख्य कार्यालयासाठी जागा भाड्याने घेण्याबाबत ठराव संमत केला असून यशवंतराव चव्हाण ट्रस्ट, प्राधिकरण निगडी येथील जागा रु.30/- प्रति स्क्वेअर फुट प्रमाणे 3000 स्क्वेअर खूप जागा भाड्याने घेण्यासाठी सर्व सदस्यांनी मान्यता दर्शवली आहे. या बाबीस देखील मंडळाचे मान्यता दर्शवली होती. यशवंतराव चव्हाण प्राधिकरण निगडी यांच्याकडून दिनांक 16/05/ 2022 रोजीच्या लेखी पत्रान्वये खालील प्रमाणे प्रस्ताव कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई प्राप्त झाला आहे. मंडळाचे कार्यालयीन कामकाजासाठी यशवंतराव चव्हाण ट्रस्ट प्राधिकरण निगडी जागेसाठी आलेल्या प्रस्तावाला मान्यता देऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, असेही सदर निवेदनात सूरज बाबर यांनी नमूद केले आहे.