शबनम न्यूज | पुणे
पुण्यात गोळीबाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. नर्हे भागातील भूमकर चौकात मध्यरात्री एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आली. पुण्यात दोन दिवसात गोळीबाराचे तीन घटना घडल्या आहेत. एका बांधकाम व्यवसायिकावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जंगली महाराज रस्त्यावर पिस्तूल रोखून गोळीबाराचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी घटली होती. त्यानंतर हडपसर मध्ये शेवाळवाडी परिसरात बुधवारी व्यावसायिक स्पर्धेतून एका निवृत्त लष्करी जवानाने एकावर पिस्तुरातून गोळ्या झाडल्या होत्या. तसेच सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुमकर चौक परिसरात गुरुवारी पहाटे अडीच वाजता एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. गणेश गायकवाड (रा. वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणावरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अभिनेते सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी शहरातील गुन्हेगाराची झडझडती घेतली होती. मात्र त्यानंतरही शहरात गोरी बाळाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.