शबनम न्युज / बारामती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना दिले.
मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. त्यामध्ये चर्चा होईल. तसेच या बैठकीमध्ये सोमवारपासून दुकाने उघडू द्या अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. त्याबाबत देखील चर्चा होईल. याबाबत आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल. बारामतीत बैठक घेऊन इंजेक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. कोरोनाची होणारी रूग्णवाढ आपल्याला रोखायची आहे. त्यासाठी काही कठोर निर्बंध घालून दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पोलिस यंत्रणेने करावी, अशा सुचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या आहेत.