चीज सॅन्डविच हा एक प्रकारचा स्नॅक्स आहे. चीज सॅन्डविच बनविण्यासाठी जास्त मेहनत हि करावी नाही लागत,आणि अगदी कमी वेळात हे बनते. तर आज आपण जाणून घेऊ चीज सॅन्डविच बनविण्याची विधी…
घटक : –
१. ब्रेड ,२.टोमॅटो सॉस,३.कांदे,४.हिरवी मिरची,५.टोमॅटो,६.कोशंबीर,७.काकडी,८.मीठ,९.चीज,१०.अमूल बटर,११.बटाटे,१२.मिरची पावडर,१३.हळद १४.धनिया पावडर .
सर्वात प्रथम २ ते ३ बटाटे शिजवून घ्या. बटाटे शिजल्यानंतर त्यास थंड होऊ द्या. मग नंतर बटाटे थंड झाल्यानंतर त्या मध्ये १ कांदा बारीक चिरलेला,३ मिरची चिरलेली, १ टमाटा बारीक चिरलेला,अर्धी काकडी बारीक चिरलेली, थोडीशी कोशंबीर चिरलेली, मीठ (चवीनुसार),अर्धा टिस्पून हळद,अर्धा टिस्पून मिरची पावडर, अर्धा टिस्पून धनिया पावडर हे सर्व पदार्थांचे मिश्रण करून घेणे. मिश्रण केल्यानंतर ब्रेड घेऊन ब्रेड वर मिश्रण हे चांगल्या प्रकारे लावावे.मग चीज ही बारीक करून त्यावर टाकावी. आणि तव्यावर एक एक करून फ्राय करून घ्यावे. आणि लक्षात ठेवा सॅन्डविच फ्राय करताना गॅस चे तापमान कमी असावे.आणि मग फ्राय झाल्यानंतर सॅन्डविच ब्रेडचे दोन भाग करून लाल टोमॅटो सॉस सोबत किंवा चिली सॉस सोबत सर्व्ह करावे.
अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात स्वयंपाक घरात जास्त उभं न राहता लवकर बनवता येणारे हे खाद्यपदार्थ आहे. अगदी चवदार पदार्थ आहे. नक्कीच आपण एकदा तरी ट्राय करून बघावे.