(सिमरन सय्यद)
मॅगी हि सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ. मॅगी तर सगळेच बनवतात पण कधी विचार केला का? कि मॅगीपासून वेगळं काही खाद्यपदार्थ बनू शकते का? तर हो..मॅगी पासून अनेक खाद्यपदार्थ बनवता येतात. जसे आज मी आपल्याला मॅगी पासून नवीन घटक म्हणजे मॅगीची भजी कशी बनवावी त्या बद्दल आजची रेसिपी सांगत आहे. तर चला जाणून घेऊ मग मॅगीची भजी कशी बनवावी…
घटक :-
१.मॅगी, २.हिरवी मिरची,३.तेल,४.कांदे,५.हिरवी शिमला मिर्च,६.आलं आणि लहसून,७.कोशंबीर,८.हळद,९.लाल मिर्च पावडर,१०.जिरा पावडर,११.धनिया पावडर,१२.मीठ,१३.अमूल बटर,१४.बेसन पीठ,१५.मैदा,१६.कच्ची मॅगी.
सर्वात प्रथम आपण एक पॅकेट मॅगी हि कच्ची ठेऊ आणि बाकी मॅगी शिजवून घेणे.मॅगी शिजवल्यानंतर थंड होण्यासाठी ठेवणे.मॅगी थंड झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला १ कांदा,थोडीशी बारीक चिरलेली कोशंबीर,बारीक चिरलेले २ हिरवी मिरची,२ हिरवी शिमला मिरची,आलं आणि लहसून यांचे बारीक मिश्रण, अर्धा टिस्पून हळद,अर्धा टिस्पून लाल मिर्च पावडर,अर्धा टिस्पून जिरा पावडर,अर्धा टिस्पून धनिया पावडर,मीठ (चवीनुसार),अर्धा चमचा अमूल बटर,एक टिस्पून बेसन पीठ हे सर्व पदार्थांचे चांगल्या प्रकारे मिश्रण करून घेणे. या सर्वांचे चांगल्या प्रकारे मिश्रण केल्यानंतर एका वाटीत मैदा घेणे. मैदा मध्ये थोडेसे पाणी टाकावे,आता आपण केलेल्या मिश्रणाचे गोळे करून मैदा मध्ये एकदा भिजवून घ्यावे, आणि ते मैदा मध्ये भिजवलेले मिश्रणला कच्ची मॅगी हि चांगल्या प्रकारे लावून घेणे. आणि गॅस चालू करून कढाईत तेल टाकून तेल मिडीयम स्वरूपात गरम होऊ देणे.तेल गरम झाल्यानंतर मिश्रणाचे केलेले गोळे आता तेलात सोडणे. आणि चांगल्या प्रकारे तळून घेणे. आता आपले मॅगीची भजी तयार झालेली आहे. तुम्ही आता तुमच्या परिवाराला चिली सॉस सोबत सर्व्ह करू शकता…
सध्या लॉकडाऊन मुळे सर्व घरीच आहे.आणि मग यावेळेत काही तरी नवीन शिकूया…या कठीण काळात घरी राहून प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूया..आणि आपल्या या वेळेत नवीन रेसिपी ट्राय करूया.