लॉकडाऊनमध्ये चांगली कामगिरी करत द्विवार्षिक लक्ष्य 3 महिन्यांत पूर्ण केले.
पुणे :- मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी) द प्रीमियर असोसिएशन ऑफ फायनान्शियल प्रोफेशनल्स ही १९२७ मध्ये स्थापन झालेली व्यावसायिकांची स्वतंत्र संघटना आहे. या संघटनेकडे जागतिक स्तरावर ७० पेक्षा जास्त देश आणि ५०० हून अधिक प्रदेशांमध्ये विस्तारित कंपन्या आहेत , तसेच ही जगातील आघाडीच्या जीवन विमा आणि वित्तीय सेवांमध्ये कार्यरत ७२,००० हून अधिक व्यावसायिकांची स्वतंत्र संस्था आहे. यावर्षी साथीचा आजारामुळे (कोविड १९) सर्व जगभरातील व्यवसायांवर वाईट परिणाम झाले आहेत, अर्थातच विमा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, विमा क्षेत्रात कमी काम झाले आहे, मुख्यत: याचे कारण आहे या काळातील भारतातील लॉकडाऊन,आणि या परिस्थितीतही एलआयसीचे विमा प्रतिनिधी आणि एमडीआरटी डॉलर राउंड टेबलचे पुरस्कार विजेते दीपक बंसल यांनी त्यांचे द्विवार्षिक लक्ष्य अवघ्या ३ महिन्यांत पूर्ण केले आणि मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी) पुरस्कार मिळविला. भारतातील सुमारे १२ लाख ५० हजार लोक विमा पॉलिसीची विक्री करतात, त्यापैकी १ टक्क्यांहून कमी लोकांना एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त होतो. दीपक बंसलने आपले द्विवार्षिक लक्ष्य केवळ तीन महिन्यांत पूर्ण केले आहे. २०१२ पासून एलआयसीमध्ये कार्यरत दीपक बंसल हे एमडीआरटीचे पुरस्कार विजेते आहेत.जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल, त्याच्या कुटूंबाला त्याच्या विमा पॉलिसीची माहिती नसेल, पॉलिसी परिपक्व झाली आहे आणि कोणीही त्याच्यावर दावा केलेला नाही, अशा परिस्थितीतही दीपक बन्सल स्वत: पुढाकार घेतात आणि नामनिर्देशित व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधतात आणि त्यांचा फायदा देण्यास मदत करतात . त्यातून ते सामाजिक जबाबदारी पार पाडत लोकांची विनाशुल्क सेवा करतात. टीम वनचे २२ शहरांमध्ये १४३ असोसिएट्स कार्यरत आहेत. ज्यामध्ये ७० हजार ग्राहकांना सेवा दिली जाते. पुण्यात एकूण २० हजार विमा प्रतिनिधी आहेत, त्यापैकी दीपक बंसल पहिल्या दहांमध्ये उत्कुष्ट म्हणुन ओळखले जातात. एमडीआरटी सदस्य व्यावसायिक ज्ञान आणि उत्कृष्ट ग्राहक सेवेसाठी ओळखले जातात. जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यवसायातील उत्कृष्टतेचे मानक म्हणून एमडीआरटी सदस्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखली जाते. एमडीआरटी पात्रता मिळविण्यासाठी (०१ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत) एमडीआरटी समिती तर्फे निर्धारित कुठल्याही कमिशन किंवा प्रीमियम पैकी कोणतीही एक अट पुर्ण करणे आवश्यक आहे.त्याद्वारे एमआरडीटीची मेंबरशिप मिळते.