शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये नव्याने ताब्यात येणाऱ्या प्रसून धाम सोसायटी मागील मोकळ्या जागेत शिक्षण विषयक जनजागृती करणारी उद्यान उभारण्यात यावे या मागणीचे निवेदन शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग क्रमांक 23 मधील प्रसून धाम सोसायटी मागील नव्या ताब्यात येणाऱ्या मोकळ्या जागेत महापालिकेमार्फत शिक्षण विषयक जनजागृती करणारे उद्याने विकसित करावे, यशस्वी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे शिक्षण हे आपण ही जाणता मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो तो तितकाच यशाच्या शिखरावर जाऊन बसतो, शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्त्वाची असते देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे ,विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते ,शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे
त्यामुळे प्रभाग क्रमांक 23 प्रसूनधाम सोसायटी मागील नव्याने ताब्यात येणाऱ्या जागेत शिक्षण विषयक जनजागृती करणारे उद्यान उभारावे जेणेकरून लहान वयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करण्यास मदत होईल असे सांगत मनिषा पवार यांनी सदर मागणीचा सकारात्मक विचार व्हावा असेही मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.