शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी परिसरात दहशत पसरवणाऱ्या आणि गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार सचिन राकेश सौदाई टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवार (दि.11) रोजी दिले आहेत. सचिन सौदाई टोळीतील 7 जणांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
टोळी प्रमुख सचिन राकेश सौदाई (वय-36 रा. अशोक थिएटर जवळ, पिंपरी), सनी उर्फ नितीन राकेश सौदाई (वय-30 रा. साईनाथ सोसायटी, फ्लॅट नं. 24, अशोक थिएटर जवळ, पिंपरी), अजय विजय टाक (वय-26 रा
झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी), अनिल उर्फ बाबा उर्फ गोऱ्या सुशिल पिवाल (वय-31 रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी), तरुण उर्फ मोनु बिपीन टाक (वय-30 रा. झुलेलाल मंदिराजवळ, सुभाषनगर, पिंपरी), जतिन उर्फ सोनु मुकेश मेवाती (वय-21 रा. बोपखेल), तौसिफ सय्यद (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
सचिन सौदाई आणि त्याच्या टोळीवर खुन, खुनाचा प्रयत्न, कट रचून दरोडा घालणे, अपहरण, खंडणी मागणे, दुखापत, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग, व बेकायदेशीररित्या घातक शस्त्र जवळ बाळगणे असे एकूण 15 गुन्हे पिंपरी-चिंचवड आयुक्तालय तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत दाखल आहेत. हे आरोपी संघटीतपणे गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार, पि.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, अनिल गायकवाड, पोलीस नाईक विष्णू भारती, पोलीस शिपाई ओंकार बंड यांच्या पथकाने केली.