शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड
शिवसेने चे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी त्यांच्या शब्दात सांगितले या घटने बाबत
आज सकाळी माझ्या भागातील सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगवले यांचा फोन आला आम्हाला स्मशान पास देत नाही काहीतरी करा नाहीतर तुम्ही वायसीएम ला या.
घडलेला सविस्तर प्रकार
माझ्या भागातील राजू हिवराळे यांचा कॅन्सर या आजारावर उपचार सुरू असताना मुंबई येथील प्रसिद्ध टाटा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता नातेवाईकांनी त्या ठिकाणी कागदपत्रांची पूर्तता करून मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आपल्या पिंपरी-चिंचवडमध्ये काल वायसीएम रुग्णालय येथे आणला पण या ठिकाणी वायसीएम रुग्णालयात मुंबई महानगरपालिकेच्या स्मशान पास व मृत्यू चा अहवाल असलेला ओरीजनल दाखला आणला नसल्याने आम्हाला स्मशान पास देता येणार नाही असे वाय सी एम रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांना सांगितले सदर प्रकार नातेवाईकांनी सुनील इंगवले यांच्यामार्फत माझ्या कानावर घातला त्यांनी विनंती केली असता मी सकाळी साडेआठला वायसीएम रुग्णालय येथे गेलो आणि संबंधित कर्मचाऱ्यांना स्मशान पास देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी त्यांनीही मला वरील कारणे सांगत स्मशान पास देता येणार नसल्याबाबत असमर्थता दर्शवली याबाबतीत मी तातडीने मुंबई येथे टाटा रुग्णालयाला संपर्क साधत त्यांना मृत्यू चा अहवाल असलेला ओरीजनल दाखला देणे बाबत विनंती केली या वेळी आम्हाला ओरिजनल दाखला देता येणार नाही आम्ही तो मुंबई महानगरपालिकेला सबमिट करू असे कारण सांगण्यात आले यानंतर मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांनाही स्मशान पास देणेबाबत विनंती केली पण त्यांनीही असे सांगितले की आम्ही फक्त रुग्णालयांच्या कागदपत्रांवर स्मशानभूमीत नोंद करतो व परवानगी देतो त्यामुळे स्मशान पास देण्याचा प्रश्नच होत होत नाही सर्व कारणे सांगून विनवण्या करुनही कायद्याचा आधार घेत टाटा रुग्णालय व मुंबई महानगरपालिका यांनी हात वर केले.यावेळी सदर प्रकार मी वाय सी एम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे यांच्या कानावर घालण्याचे ठरवले.सदर बाबतीत डॉक्टर राजेश वाबळे यांच्या कार्यालयात गेलो असता तर कळाले की तिथे हेड ऑफ डिपार्टमेंट मिटींग सुरू आहे . खूप वेळ होऊनही मीटिंग संपता काही संपेना मृताचा भाऊ माझ्यासोबत होता त्याचा चेहरा अत्यंत कासावीस व रडवेला झाल्यासारखं झाला होता शेवटी वैतागून मीच डॉ. बाबळे यांना मेसेज पाठवला त्यांनी मला तातडीने आत मध्ये बोलवले सदर प्रकार मी त्यांच्या कानावर घातला त्यावर त्यांनी वायसीएम रुग्णालयातील शवविच्छेदन अधिकारी डॉक्टर शिंगे यांच्याकडे पाठवले त्यावर त्यांनी नातेवाईकांचा संमती पत्र घेऊन स्मशान परत ते देता येईल असे उपनिबंधकांना सांगितले व आम्हाला वायसीएम रुग्णालयाचे उपनिबंधक जन्म मृत्यू विभाग डॉ. जाधव यांच्याकडे पाठवले.त्यावर पुन्हा डॉ. जाधव यांनी आम्हाला CMO डॉ. मुंडे यांना भेटून त्यांना याबाबतीत कारवाई करण्याचे सांगितले.आता आमची अवस्था गोल गोल फिरवल्यासारखे होत चालली होती. CMO डॉ. मुंडेयांनी पुन्हा डॉ. जाधव यांना सांगून पोलिसांकडे जाण्याबाबत सल्ला दिला . कोण कोणाची जबाबदारी घेते अथवा झटकतय आम्हाला काही कळतच नव्हते कारण हा प्रकार तसा गंभीर होता.
या सर्व प्रकारात कधी बारा वाजले ते कळलच नाही तिकडे नातेवाईक एकदम कावरेबावरे होऊन रडवेले झाले होते काही मार्गच निघत नव्हता मग शेवटी परत डॉ.वाबळे यांच्याकडे गेलो.त्यावेळी त्यांना सर्व प्रकार सांगितला तिकडून आम्हाला काही कागदपत्रे मिळत नाहीत आणि तुमची लोक आम्हाला काही स्मशान पास देत नाही.मी डॉ.वाबळे यांना याबाबतीत मृतदेहाचं पोस्टमार्टेम करता येईल का असे विचारले त्यावर त्यांनी पुन्हा वायसीएम हॉस्पिटल पोलीस चौकी येथे विचारणा करण्यास सांगितले . शेवटी गोल गोल फिरून आम्ही वाय.सी.एम पोलीस चौकीला गेलो. त्याठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे साहेब यांना घडलेला प्रकार सांगितला व त्यांना विनंती केली की या बाबतीत आता मार्गच निघत नाहीये तुम्ही मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्याबाबत कारवाई करावी जेणेकरून अंत्यसंस्कार करण्याबाबत स्मशान पास नातेवाईकांना मिळेल या सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे साहेब यांनी तातडीने आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून झिरो नंबर ने भोईवाडा पोलीस स्टेशन येथे शवविच्छेदन करून पंचनामा व प्रकरण वर्ग करावे असे ठरले.यावर नातेवाइकांनी आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.अखेरीस प्रकरण तडीस गेले सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला तो मृतदेह शवविच्छेदन करूनच अंत्यसंस्कारासाठी ताब्यात मिळाला.
मुळात ही पोस्ट लिहायचा उद्देश असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशा कामात खूप संघर्ष करावा लागतो. याच ठिकाणी सर्वसामान्य माणूस असता तर काय झाले असते. मुळात कायद्याच्या चौकटीत राहून खूप काही करता येते. त्याच्यासाठी प्रशासनाची देखील इच्छाशक्ती लागते पण यावर आता भाष्य करणे योग्य नाही
घडलेला प्रकार लक्षात घेऊन आपणही आपल्या जवळील कोणाचा इतर जिल्ह्यात मृत्यू झालेला असेल त्या ठिकाणचा तेथील स्थानिक प्रशासनाकडून स्मशान पास घेऊनच येणे हे लक्षात ठेवा. अन्यथा तुम्हालाही वरील त्रास होईल .