शबनम न्युज / पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी ग्रुप ग्रीन मोहिमेअंतर्गत वृक्ष वाटप कार्यक्रम घेतला जात आहे या कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहित केले जात आहे सध्या कोरोना महामारी मुळे ऑक्सिजन मिळविणे किती महत्त्वाचे असते हे प्रत्येक माणसाला समजले आहे येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला नैसर्गिक ऑक्सिजन मिळावे, वातावरण प्रदूषण विरहित रहावे याकरिता जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी ग्रोव ग्रीन मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांना वृक्ष चे रोप भेट म्हणून देण्यात येते व वृक्षारोपण करण्याचे महत्त्व पटवून देण्यात येते या मोहिमेअंतर्गत आज पर्यंत पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे राष्ट्रवादी ग्रोव ग्रीन मोहिमेअंतर्गत अश्विनी ताई कांबळे ,अमित भोसले ,योगेश तायडे ,सुरेश यादव ,अकबर भाई मुल्ला यांनाही वृक्ष रोपण करण्यासाठी व या बाबत जनजागृती करण्याकरिता वृक्ष वाटप करण्यात आले अशी माहिती राष्ट्रवादी ग्रोव ग्रीन च्या वतीने सांगण्यात आले
एजाज चौधरी यांनी या बाबत पुढाकार घेतला असून रोज ६ ते ७ जणांना वृक्ष वाटप करण्यात येते