पिंपरी, दिनांक १५ जून २०२१- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग स्तरावर ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडी येथे कोविड लसीकरण केंद्र सुरु करणेत आले आहे. या केंद्रास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी भेट देऊन लसीकरण केंद्राची पाहणी केली. तसेच त्याठिकाणी देण्यात येणा–या सेवा सुविधा, अडीअडचणींबाबत महापौर ढोरे यांनी प्रशासनास विविध सुचना दिल्या. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही यासंबंधी दक्षता घेण्यात यावी असे निर्देश दिले. त्यांचेसमवेत नगरसेविका शारदा हिरेन सोनवणे, ह क्षेत्रिय अधिकारी अभिजित हराळे यांचेसह वैद्यकीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement