पुणे, दि. 18 : पुणे विभागातील 15 लाख 74 हजार 453 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 16 लाख 51 हजार 287 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 42 हजार 653 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 34 हजार 181 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.07 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.35 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 36 हजार 335 रुग्णांपैकी 10 लाख 8 हजार 368 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10 हजार 540 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.30 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 83 हजार 655 रुग्णांपैकी 1 लाख 70 हजार 596 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 740 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 319 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 59 हजार 180 रुग्णांपैकी 1 लाख 52 हजार 176 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 696 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 308 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 33 हजार 953 रुग्णांपैकी 1 लाख 20 हजार 816 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 316 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 821 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 38 हजार 164 रुग्णांपैकी 1 लाख 22 हजार 497 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 361 आहे. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 504 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 89, सातारा जिल्ह्यात 727, सोलापूर जिल्ह्यात 428, सांगली जिल्ह्यात 877 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 383 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 653 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 275, सातारा जिल्हयामध्ये 994, सोलापूर जिल्हयामध्ये 387, सांगली जिल्हयामध्ये 587 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 410 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरणाचे प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 31 लाख 30 हजार 126, सातारा जिल्ह्यामध्ये 8 लाख 10 हजार 216, सोलापूर जिल्हयामध्ये 6 लाख 44 हजार 862, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 47 हजार 954 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 12 लाख 18 हजार 600 नागरिकांचा समावेश आहे.