शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, महावितरण कार्यालयात सतत निवेदने देऊन व पाठपुरावा करून दत्तनगर परिसरातील अंडरग्राउंड केबल वायर टाकणे, व डीपी बसविण्याची मागणी वारंवार पाठपुराव्याने पूर्ण झाली असून, प्रभागातील त्रिमूर्ती चौक दत्तनगर येथे अंडरग्राउंड केबल वायर व डीपी बसविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी दिली.
Advertisement
सदरचे काम बरेच दिवसापासून पूर्ण करण्याची मागणी प्रभागात होत होती. त्याचा पाठपुरावा माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी अविरतपणे केले. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक मनोज खानोलकर तसेच महावितरण विभागाचे आभार व्यक्त केले.