शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनीषा प्रमोद पवार यांनी थेरगाव परिसरातील प्रभाग क्रमांक 23 मधील साने गुरुजी शाळा येथे लसीकरण केंद्र नव्याने सुरू करण्यात यावे,अशी मागणी ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या पत्रात मनिषा पवार यांनी नमूद केले आहे की, सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्ण संख्येमध्ये काही दिवसापासून पुन्हा वाढ होत आहे. याकरिता कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे आवश्यक आहे. थेरगाव येथील प्रभाग क्रमांक 23 मधील सानेगुरुजी शाळेच्या इमारतीमध्ये एक नवीन लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, जेणेकरून थेरगाव मधील नागरिकांना लसीकरणाची सुविधा उपलब्ध होईल व जास्तीत जास्त नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेतील, व प्रभाग क्रमांक 23 मधील नागरिकांना आरोग्याच्या धोका राहणार नाही. तरी त्वरित नवीन लसीकरण केंद्र थेरगाव येथील साने गुरुजी शाळेत सुरू करण्यात यावे, अशी मागणी मनीषा प्रमोद पवार यांनी केली आहे.