शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत नळजोडणी दंड आकारुण अधिकृत करून .अभय योजना राबवावी.अशी मागणी छावा क्रांतीवीर सेना पिंपरी-चिंचवड विधानसभा.अध्यक्ष संजय ठाकरे यांनी मनपा आयुक्त, सह-आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात संजय ठाकरे यांनी नमूद केले आहे कि कोरोना काळ हा गेले वर्षभर ते दुसरे वर्षे असा मोठा वेळ लाँकडाऊन आणि महामारीला सामोरे जात सद्यस्थितीत पिंपरी-चिंचवड चे नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांना आर्थिकदृष्टया मागास झालेल्यां अवस्थेत नेऊन ठेवले आहे.परिणामी खर्चाच्या मानाने महानगरपालिकेच्या उत्पन्नात घट झालेली दिसुन येते मात्र विविध कल्याणकारी योजना राबवित असताना महानगरपालिका प्रशासनावर आर्थिक भार वाढलेला दिसतो
महापालिकेचे उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत नळजोडणी केलेल्या हजारो नागरिकांना दिलासा (अभय) देत अनधिकृत नळजोडण्या दंड आकारून नियमित (अधिकृत) करत ,नागरिक कल्याणकारी अभय योजनेमुळे न घाबरता स्वयंस्फूर्तीने वर्षोनुवर्षे अनधिकृत नळजोडणी वापरत आलेले – अधिकृत करण्यासाठी स्वतः हुन पुढे येतील.. परिणामी महापालिके समोर उभे असलेले अनधिकृत नळजोडणीचा प्रश्न एक-प्रकारे मार्गी लागेल.त्याच बरोबर महानगरपालिकेला आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यासाठी हातभार लागेल.
सर्व परिस्थिती पाहता आमच्या प्रमुख मागण्या :-
१) अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी नव्याने योजना राबविण्यात यावी.
२) योजनेचा कालावधी किमान ३ महिने ते ५ महिने मुदत द्यावी.
३) अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी ची दंडाची रक्कम रुपये ७,००० ते १०,००० असावी.
४)अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी ची दंडाची रक्कम भरणे साठी दोन टप्प्यांत विभागणी करून घेण्यात यावी.
५) अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यासाठी ची दंडाच्या एकुण रक्कमे पैकि प्रथम ८०% रक्कम भरणार्या नागरिकांस अनधिकृत नळजोडणी अधिकृत करण्यात यावी व उर्वरित २०% दुसर्याच महिन्यात भरावी.अन्यथा नळजोडणी अधिकृत करण्यासाठी भरलेली एकुण रक्कमे वर दंड आकारत नळजोडणी तोडण्याची कार्यवाही करावी.