शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी, दि. १२ ऑगस्ट २०२१ :- पिंपरी-चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरातील साई हाउसिंग सोसायटी, सरोवर हौसिंग सोसायटी, स्वप्ननगरी सोसायटी, राजयोग कॉलनी ते धर्मराज चौक, गुरुद्वारा चौक रोड ,रस्त्यास जोडणाऱ्या नाण्यांवर तसेच गुरुद्वारा रोड ,वाल्हेकर वाडी चिंचवड या सोसायट्यांच्या लगत असलेल्या नाल्यांवर स्लॅब टाकून मिळावे या मागणीचे निवेदन कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे सचिव गणेश बाबर यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात गणेश बाबर यांनी नमूद केले वाल्हेकरवाडी चिंचवड परिसरातील सोसायट्यांच्या लगत नाले असून हा नाला डी वाय पाटील कॉलेज कडे जाणाऱ्या रस्त्याला तसेच धर्मराज चौक ते गुरुद्वारा चौक याला मिळत असून त्यावर जर स्लॅब टाकला तर नागरिकांना डी वाय पाटील रोड तसेच स्टेशन कडे जायला खूप सोयीस्कर होईल व येथील रहिवाशांना त्याचा फायदा होईल त्याचप्रमाणे नाल्यांमध्ये गवत वाढणे तसेच डास, मच्छर निर्मिती होत असते त्यामुळे अनेक आजारांना नागरिकांना सामोरे जावे लागते व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते त्यामुळे जर या नाल्यांवर स्लॅब टाकला तर नागरिकांना एक पर्यायी रस्ता मिळून जाईल तसेच नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहतील याकरिता नाल्यांवर स्लॅब टाकणे संदर्भात संबंधितांना आदेश द्यावे अशी मागणी गणेश बाबर यांनी केली आहे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,