शबनम न्यूज / पिंपरी
वृक्षगणना संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका समोर रयत विद्यार्थी परिषद एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती रयत विद्यार्थी परिषद वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथिल खाजगी आणि शासकीय जागेवरील वृक्ष गणना संदर्भात मे. टेरेकोन इकोटेक प्रा.लि या ठेकेदारास वृक्षगणना संदर्भात 11जानेवारी 2018 रोजी 2 वर्षे वृक्षगणना आणि 3 वर्षे देखभालीचे काम देण्यात आले होते. परंतु आज 3 वर्षे उलटून देखील वृक्षणनेचे कामकाज अपुर्ण आहे. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन कुंभकर्णाच्या भुमिकेत आहे .या झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी रयत विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहे. अशी ही माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
1) पिंपरी महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या खाजगी आणि सरकारी जागेवरील वृक्षगणना लवकरात लवकर पूर्ण करावी.
2)मे. टेरेकाँन इकोटेक प्रा. लि.या ठेकेदाराकडून 2 लाख 73 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात यावा.
3) मे. टेरेकाँन इकोटेक प्रा. लि. या ठेकेदाराने पालिकेचा आणि नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया घालविल्यामुळे त्याला काळया यादीत टाकण्यात यावे.
4) संबंधित ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे.
अशा मागण्या रयत विद्यार्थी परिषद वतीने करण्यात आलेल्या आहेत.