शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथे रामकृष्ण मंगल कार्यालयात महिला उद्योजिका मेळावा आयोजित करण्यात आला होता महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी घे भरारी हा उपक्रम घेण्यात आला या महिला मेळाव्याचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्बन सेल महिला व बालकल्याण समिती समन्वयक व उपाध्यक्ष महिला सेल बचत महासंघ सौ अस्मिता कांबळे यांनी या महिला उद्योजक मेळाव्यातील स्टॉलची पाहणी केली व बचत गटातील महिलांना स्वावलंबी बनावे असे मार्गदर्शन या वेळी त्यांनी केले.
यावेळी बोलताना अस्मिता कांबळे यांनी सांगितले की महिलांनी समाजात आपले स्थान निर्माण करावे, स्वतःचा व्यवसाय सुरू करावा ,स्वतःच्या पायावर उभे राहावे ,स्वावलंबी बनावे तसेच घराची जबाबदारी बरोबरच सामाजिक जबाबदारी व व्यावसायिक वृत्ती महिलांनी अंगीकारली तर महिला सक्षम व सशक्त होतील, याकरिता महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करून स्वावलंबी बनावे ,शासनाने वेगवेगळ्या योजना महिलांसाठी दिले आहेत या योजनांची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा लाभ महिलांनी घ्यावा असेही आवाहन यावेळी अस्मिता कांबळे यांनी उपस्थित महिलांना केले यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.