शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
चिंचवड | प्रतिनिधी
श्री गोतारणे यांच्या शुभहस्ते अंध अपंग विकास असोसिएशन या संस्थेमध्ये अमृतमहोत्सवी ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी बोलताना बी आर माडगूळकर म्हणाले,” अनेकांच्या सेवेतून, त्यागातून, आणि बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्याचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे.”
या प्रसंगी बोलताना श्री बी आर माडगूळकर म्हणाले, श्री दिनकर (अप्पा ) गायकवाड हे अंध अपंग विकास असोसिएशनचे अध्यक्ष होते.श्री प्रदीप गायकवाड हे संस्थेचे कोषाध्यक्ष होते.लागोपाठ झालेला दोघांचा अंत हा अत्यंत शोकदायक आहे.त्यांचे कार्य चालू ठेवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.लोकशाही, समाजवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता,बंधुता या विचारांच्या आचरणातून च देश एकसंघ राहणार आहे. राजकारणी लोकांनी जनतेला कोरोनाची भीती घालून फार काळ फसवता येणार नाही.
बी आर माडगूळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेच्या अध्यक्ष स्थानी असणारे अलोक गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमास श्रीमती किरण दिनकर गायकवाड चिंतामणी कुलकर्णी,दशरथ डोके, श्रीमती स्मिता गायकवाड, उल्हास झिरपे, चंद्रकांत सहाणे , अलोक गायकवाड , दशरथ डोके ,रशिद सय्यद ,संजय कुलकर्णी ,जयराम दहातोंडे ,प्रकाश शिंदे ,विष्णू अडागळे ,मारुती चारोळे , दिगंबर सोनवणे , गणेश खरात ,साईनाथ बेन्द्रे सयाबाई पवार , कुलदीप खंडागळे ,नरेंद्र निकाळजे , सचिन नलवडे , सोनल नलवडे उपस्थित होते.
या प्रसंगी चिंतामण कुलकर्णी यांनी अपंग मुलांसाठी अत्यावश्यक असणारे टॅलिफर देण्यात आले यामुळे अपंग मुलांना चालण्यास मदत होते . तसेच अपंग मुलांना खाऊ वाटप करण्यात आला