शबनम न्यूज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भाजपचे विद्यमान नगरसेवक माजी स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या प्रयत्नातून त्यांच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये पिण्याच्या पाण्याचे टाकीचे काम पूर्ण झाले आहे. त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
नगरसेवक विलास मडिगेरी २०१८ वर्षी स्थायी समिती सदस्य झाल्यानंतर त्यांनी प्रभाग ८ मध्ये विशेष निधी मंजूर करून घेतला त्याप्रमाणे बजेट अंदाजपत्रकाततरतूद करून घेतली त्यानुसार सेक्टर ४,६,९ साठी २० लक्ष लिटर चे २ टाकी साठी निधी उपलब्ध करून घेतली त्यानुसार निविदा प्रक्रिया पुर्ण करुन स्थायी समिती २८/०२/२०१९ रोजी मंजुरी दिली त्यानंतर नगरसेवक विलास मडिगेरी सभापती झाल्यानंतर त्यांनी १८ ऑगस्ट २०१९ रोजी कामाचा आदेश दिला. Covid काळामध्ये कामास उशिर झाला आत्ता काम प्रगती पथावर आहे ऑक्टोबर २०२१ मध्ये पाण्याची टाकीचे काम पूर्ण होणार आहे.
टाकीची क्षमता 24 लक्ष लिटर आहे. सदर काम सुरु असताना असताना विलास मडिगेरी यांनी स्वतः भेट देऊन कामाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या सोबत मनपाचे उपअभियंता श्री किरण अंदुरे कनिष्ठ अभियंता अनिल इदे कॉन्ट्रॅक्टर चे इंजिनिअर उपस्थित होते.