💫 शबनम न्यूज वर्धापन दिन💫 सर्वांना घर बसल्या मिळते सुखी,दुःखी सारे समाचार त्यासाठी कष्टती दिनरात पोहचवी प्रखरतेने विचार ||१|| पुर्ण झालीत पाच वर्षे खरे रौप्य महोत्सवी हो दिनास देवाणघेवाण तेच करतात स्वप्न उद्याचीच पाहण्यास ||२|| साप्ताहिक बातम्या,पोर्टल यशस्वी चालली वाटचाल दैनिक मध्ये हो पदार्पणास उत्सुकतेने करा हालचाल ||३|| राजकारण,शैक्षणिक,आर्थिक सामाजिक,वैचारिक,साहित्यिक लेख,काव्य,बातमी, रूपातून विचार करी सखोल भौगोलिक ||४|| विचारांना वाचा फोडण्यास नित्य शबनम न्यूज जागरूक परखड कानउघाडणी करते अचूक भाषेतून खरी मार्मिक ||५|| तुमच्या कीर्तिवंत कार्यास प्रतिमाच्या प्रेमळ शुभेच्छा शबनम न्यूजच्या वाटचालीस प्रेमळ,मधुर, गोड सदिच्छा ||६|| सौ.प्रतिमा अरुण काळे