शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे उपाध्यक्ष संजय जगताप यांचे वडील कै. ज्ञानदेव धोंडीबा जगताप यांचे रविवार दि. २२.०८.२०२१ रोजी मोहननगर चिंचवड येथे वयाच्या ७६ व्या वर्षी दु:खद निधन झाले. ते चिंचवड येथील एक्साईड बैटरी मध्ये नोकरीस होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी हा मंगळवार दि.३१.०८.२०२१ रोजी मोरया गोसावी मंदिराशेजारी चिंचवडगाव येथे सकाळी ८.३० वा. पवना नदीकाठी होईल.
जगताप कुटुंबीयावर जो दु:खद प्रसंग आलेला आहे त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची ताकद परमेश्वराने या कुटुंबियांना देवो, मृत आत्म्यास चिरशांती मिळो अशी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे सर्व पदाधिकारी, संचालक, स्वीकृत संचालक, सल्लागार, सभासद यांचे वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना.