रत्नागिरी पोलिसांकडून नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राणे यांच्यावरील या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता “नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे”, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
Advertisement
माध्यमांशी बोलताना त्यांची तपासणी करणारे डॉक्टर म्हणाले कि, “नारायण राणेंना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे. आम्हाला आता त्यांची ब्लड शुगर चेक करता आलेली नाही. परंतु, आम्ही ब्लड प्रेशर चेक केलं असून राणेंचं बीपी वाढलेलं आहे. ब्लड प्रेशर जास्त असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता असल्याचं म्हंटले आहे.
Advertisement