शबनम न्युज | सांगवी
नवी सांगवीतील सत्ता प्रतिष्टानच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून गणपती उत्साहात प्रतिष्टापणेपासुन सात दिवस सामाजिक सेवा सप्ताहचे आयोजन केले जाते.
पहिल्या दिवशी वृक्षारोपण, दुसऱ्या दिवशी जिल्हा रुग्णालय औध येथे रुग्णांना फळे व मास्क ,सँनीटायझर वाटप,तसेच वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचा सन्मान चिन्ह, प्रशिस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला, खाजगी व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व परीचारीका यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात स्वच्छता आभियान घेऊन, पिंपरी चिंचवड म.न.पाच्या घंटागाडी वर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी याचा ही सन्मान करण्यात आला.
अत्यंत हलाखीचे जीवन जगत असलेल्या गरजू मोलकरणीच्या मुलांना कपडे व शालेय साहित्यचे वाटप करण्यात आले. नवी सांगवीतील गरजू व गरीब रिक्षाचालकाना सी.एन.जी.कुपनचे वाटप मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी आण्णा जोगदंड म्हणाले की आपल्याला समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातुन हे प्रतिष्टान वर्षभर सामाजिक उपक्रम राबवीत आहे. प्रतिष्टानचे आयोजक सौरभ शिंदे म्हणाले की गणपती प्रतिस्थापनेचा खर्च वाचवुन,कोणतेही डेकोरेशन न करता साध्या पद्धतीने गणपती उत्सव कोरोनाचे सर्व नियम पाळुन साजरा करण्यात आला.
यावेळी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, विजेता फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. श्वेता इंगळे, पिंपरी चिंचवड युवक सेवादल चे अध्यक्ष विरेंद्र गायकवाड ,प्रतिष्टानचे अध्यक्ष अमित जगदाळे, कार्याध्यक्ष अक्षय शिंदे, आयोजक,सौरभ शिंदे, सा.का.सुरेश सकट,निखिल चव्हाण, प्रशांत कडलग ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.