शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरातील रस्ता दुरुस्ती डांबरीकरण रस्ता कॉंक्रिटीकरण तसेच पदपथांची च्या कामांना वेग आला आहे महापालिकेच्या प्रभाग 1 मधील मोरे वस्ती म्हेत्रे वस्ती मधील रस्त्यांच्या पदपथां वरील जूने सिमेंटचे ब्लॉक काढून नवीन कलर सिमेंट ब्लॉक बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे प्रभाग 1 मधील फ प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक कुंदन गायकवाड ,नगरसेविका, विधी समिती सभापती स्वीनल म्हेत्रे , नगर सेविका साधना मळेकर यांच्या ,प्रयत्नातून व माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्या सहकार्यातून मोरे वस्ती मधील पदपथां चे सुशोभीकरण व पेव्हिंग ब्लॉक बसण्याचे काम महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून करण्यात येत आहे त्यामुळे पादचारी यांची होणारी गैरसोय टाळणार असून रस्त्याच्या कडेला पदपथ यामुळे लहान मुले ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांना रस्त्याने ये-जा करताना पदपथ सोयीस्कर ठरत आहे त्यामुळे पदपथ नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे या प्रभागातील तिन्ही नगरसेवकांच्या प्रयत्नातून तसेच आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेचे स्थापत्य विभागाकडून प्रभाग 1 मधील चिखली गावठाण, रामदास नगर, पाटील नगर, मोरे वस्ती मधील अंगणवाडी रस्ता, भाजी मंडई परिसर तसेच सह्याद्री सोसायटी तसेच इतर सोसायट्यांमध्ये कलर सिमेंट ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना रस्त्याने ये-जा करताना करावी लागणारी कसरत टळणार आहे लहान मुले ज्येष्ठ नागरिकांची सोय होणार आहे त्यामुळे स्थानिक नागरिक तसेच सोसायटीमधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे