संभाजी बारणे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
शबनम न्यूज – पिंपरी चिंचवड
पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील भाजपचे नेते सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला.
थेरगाव परिसरात संभाजी बाळासाहेब बारणे यांनी प्रभाग क्रमांक 23 मधून मागील महापालिका निवडणुकीत भाजप चिन्हावर निवडणूक लढविली होती परंतु त्यांना या निवडणुकीत यश आले नाही यानंतर त्यांनी वेळोवेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या भाजप सत्ताधारी वतीने होत असलेल्या गैर कारभाराविरोधात आवाज उठविला होता त्यांनी आपली नाराजी पक्षात खुल्या पद्धतीने मांडली होती तसेच बरेच दिवसापासून ते भाजप सोडण्याच्या विचारात होते
मागील लोकसभा निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा जाहीर प्रचार केला तसेच ते बऱ्याच दिवसापासून राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होते आज त्यांनी राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केल्याने थेरगाव मधील राजकीय परिस्थिती नक्कीच बदलणार आहे.
त्यांनी पक्ष प्रवेश केला यावेळी त्यांच्या सोबत पुणे शहरातील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नगरसेवक प्रशांत जगताप यांच्यासह नगरसेवक कैलास बाबा बारणे, नगरसेवक विनोद नढे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे उद्योजक अभय मांढरे आदी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते.