शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
जेनेरिक औषध जनतेला स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत, कोणत्याही नागरिकाचा औषधाविना बळी जाऊ नये , अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी वारंवार केली होती. या मागणीच्या पाठपुराव्याला यश आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत कार्रवाहीचे आदेश दिले आहे. याची माहिती देताना गजानन बाबर यांनी सांगितले कि, गेल्या काही महिन्यांपासून आम्ही वेळोवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , देशाचे रसायन व खतेमंत्री सदानंद गौडा , आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व नॅशनल मेडिकल कमिशन यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो या मागचा उद्देश आपल्या देशातील गोरगरीब जनतेला स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत कोणत्याही नागरिकाचा औषधाविना बळी जाऊ नये हा होता तसेच वारंवार केलेल्या या मागणीची दखल घेत माननीय पंतप्रधान साहेबांनी यावर कार्यवाहीचे आदेश दिले होते तसेच माननीय पंतप्रधान साहेबांनी आपण पाहिले तर 10000 जन औषधी केंद्र ( भारतीय जन औषधी परियोजना) पर्यंत संख्या वाढवण्याची तसेच पूर्वी 2500000 लाखापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम जनऔषधि केंद्राला( भारतीय जन औषधि परियोजना) मिळत होती ती आता 7,00,000 लाखापर्यंत करून एक प्रकारचा दिलासा गोरगरीब जनतेला माननीय पंतप्रधानांनी दिलेला आहे. वरील सात लाखांपैकी 500000 लाख प्रोत्साहनपर,150000 लाख रुपये जनऔषधि केंद्राच्या फर्निचर साठी व 50 हजार रुपये बिलिंग प्रिंटर साठी अशा प्रकारची मदत जन औषधी केंद्र ( भारतीय जन औषधि परियोजना ) चालवणाऱ्या किंवा घेणाऱ्या व्यक्तींना शासनामार्फत देण्याचे पंतप्रधानांनी घोषित केले आहे तसेच आमच्या मागणीची दखल घेतल्याबद्दल आम्ही माननीय पंतप्रधानांचे गोरगरीब जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो.
केंद्रशासनाने दखल घेत जेनेरिक औषधांचा प्रचार व प्रसार टेलिव्हिजन व रेडिओ मार्फत करण्यास सुरुवात केली आहे, व याबाबत जनजागृतीही नागरिकांमध्ये होत आहे.
जन औषधी केंद्र (भारतीय जन औषधि परियोजना) वाढल्यास गोरगरीब जनतेला खूप दिलासा मिळणार आहे आज जवळपास 90 टक्के पैसे हे गोरगरीब जनतेचे वाचणार आहेत तसेच याचा फायदा थेट जनतेला मिळणार आहे व या औषध विक्रेत्यांच्या रॅकेट पासून जनतेची ही सुटका होणार आहे.