शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरे वस्ती भागात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने होत असलेल्या रस्त्याच्या विकास कामाअंतर्गत रस्त्यात येणारी मुख्य पिण्याचे पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर सर्वत्र पाणी झाले. पिण्याचे पाणी वाया जात होते . या घटनेची माहिती या भागातील युवा नेते पांडा भाऊ साने तसेच सामाजिक कार्यकर्त्या रूपाली साने यांना मिळाली असता, त्यांनी त्वरित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती देऊन भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनातून या परिसरात त्वरित पाईपलाईन दुरुस्ती करून घेतली. या कामात महानगरपालिकेचे अधिकारी यांचे सहकार्य मोठ्याप्रमाणात लाभले असल्याचे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रुपाली साने यांनी सांगितले.
Advertisement
Advertisement