शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसदस्य व सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने शहरातील नागरिकांच्या मनात स्वच्छतेची भावना जागृत करण्याकरिता या प्लॉगोथॉन स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
यावेळी प्रभाग क्र. २८ चे नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे सोबत सहकारी नगरसदस्य ,जेष्ठ नागरिक ,तरुणवर्ग ,महिलावर्ग व लहान मुले यांच्या मदतीने प्रभागातील कोकणे चौक ते पार्क रॉयल सोसायटी रस्ता आणि दत्त मंदिर ते स्वराज गार्डन रोड पर्यंत रस्त्याची स्वच्छता करून सुक्का कचरा आणि ओला कचराची विभागणी करण्यात आली.
स्वच्छता अभियान प्लॉगोथॉन मोहिमेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रभागातील नागरिकांचे विशेष आभार व्यक्त केले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील साहेब,अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब , नगरसेवक शत्रुघ्न(बापु)काटे ,सोबत सहकारी नगरसेवक ,प्रभागातील नागरिक आणि सामाजिक संस्था उपस्थित होते.