शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२५ नोव्हेंबर ) :- पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्ष वैशालीताई काळभोर ,युवक शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी नवीन चेहरे देणार असल्याचे संकेत मिळत आहेत ,मिळालेल्या माहितीनुसार या तिन्ही पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठांनी राजीनामे मागितले असल्याचे सांगितले जात आहे .
त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शहरात राष्ट्रवादी हा बदल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे .
पिंपरी-चिंचवड शहराला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद कोणाला मिळते याच्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
Advertisement
Advertisement