शबनम न्यूज : पुणे (दि.२५ नोव्हेंबर ) :- महाराणा प्रताप संघ पुणे आयोजित क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू स्टेडियम पुणे येथे दि. २३ नोव्हेंबर २०२१ ते २४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान चौथी खेलो इंडिया १८ वर्षाखालील मुलींची जिल्हास्तर निवड चाचणी कबड्डी स्पर्धा संपन्न झाली. अंतिम सामना एम.एच.स्पोर्ट्स पुणे विरुद्ध पिंपरी चिंचवड मनपा चे क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघ यांच्यात ४१-१७ असा झाला. २४ गुणांनी क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाने चौथी खेलो इंडिया जिल्हास्तर कबड्डी स्पर्धा जिंकत खेलो इंडिया चषकावर आपले नाव कोरले.
मनीषा राठोड व पूजा तेलंग यांचे उत्कृष्ट चढाई आणि भूमिका गोरे, सीफा वस्ताद, सविता गवई, रूपाली डोंगरे, कोमल राठोड यांच्या उत्कृष्ट पकड यांच्या जोरावर व तेजल महाजन, विद्या गायकवाड, प्रतिक्षा लांडगे, सखुबाई जाधव, निकिता माळी या सर्वांच्या सामजिक प्रयत्नांनी पीसीएमसी संघाने सामना एकतर्फी करीत आपल्याकडे विजय राखून ठेवला.
तनिष्क शिंदे, अनुष्का चव्हाण, अमृता अग्रवाल या एम एच पुणे कबड्डी संघाच्या मुलींना प्रयत्न तोकडा ठरला . पीसीएमसी संघाने सर्व सामने चांगल्या गुणांच्या फरकाने जिंकले.
उप उपांत्य –
क्रीडा कला विकास प्रकल्प पीसीएमसी वि.वि. महेश दादा स्पोर्टस फौंडेशन (३१ -१७)
उपांत्य-
क्रीडा कला विकास प्रकल्प पीसीएमसी वि.वि. राजमाता पुणे (३३-१४)
अंतिम –
क्रीडा कला विकास प्रकल्प पीसीएमसी वि.वि. एम.एच.पुणे (४१-१७)
सदर स्पर्धेत एकूण ३२ कबड्डी संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे कामकाज राष्ट्रीय पंच दत्ता झिंजुर्डे, जिल्हा पंच प्रमुख संदीप पायगुडे, सहकार्यवाह राजेंद्र आंदेकर, श्री शिवाजी कोळी क्रीडा मार्गदर्शक यांच्या नियंत्रणाखाली पार पडले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे राजेश बागुल, शिवछत्रपती पुरस्कार्थीं शरद अण्णा चव्हाण, प्रविण उर्फ राजाभाऊ पासलकर (सह कार्यवाहक महाराणा प्रताप संघ) यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
विजयी संघाला मार्गदर्शन क्रीडा शिक्षक आठवे बि.जी. यांनी केले. तसेच सोनाली जाधव यांनी व्यवस्थापिका म्हणून काम पाहिले.
पीसीएमसी च्या विजयी संघाचे पुष्पगुच्छ देऊन सुषमा शिंदे (सहाय्यक आयुक्त क्रीडा), रज्जाक पानसरे (क्रीडा अधिकारी पीसीएमसी), माध्यमिक विद्यालय थेरगाव चे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम, विश्वास गेंगजे (क्रीडा पर्यवेक्षक), रामेश्वर पवार, गोपीचंद करंडे यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.