शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
बोले तैसा चाले या म्हणी प्रमाणे अजित दादा काम करतात. त्याप्रमाणे आज पासुन पिपंरी चिचंवड शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक यांनी पिपंरी चिचंवड येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात उपस्थित राहुन कामास सुरूवात केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार त्यांचे दोन स्वीय सहायक आजपासून दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पक्ष कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. या वेळी सरकारशी संबंधित कामकाजाबाबतची निवेदने, पत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, सार्वजनिक कामांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत. या उपक्रमाचा निश्चितच पुणेकरांना वेळ आणि श्रमाच्या दृष्टीने फायदा होणार आहे.’’
तसेच ते स. 11 ते 2 या वेळेत उपस्थित राहणार आहे. यावेळी त्यांचे स्वागत मा. विरोधी पक्षनेते तथा विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पक्ष कार्यालयात केले. व जावून चर्चा केली. यावेळी प्रेरणा बँकेचे संचालक कांतिलाल गुजर व आदी उपस्थित होते.