शबनम न्युज | चिखली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने आणि स्व. दत्ताकाका साने प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी ( दि. ४) आणि रविवारी ( दि. ५) चिखली-मोरेवस्ती येथील अंगणवाडी चौकातील महापालिका शाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे.
फॅमिली प्लॅनिंग असोशिएशन ऑफ इंडियाच्या माधमातून हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण, बॉडी मास इंडेक्स, हिमोग्लोबीन चाचणी, रक्तदाब तपासणी, स्त्री रोग आणि गर्भधारणेसंबंधित समस्या, सामान्य आरोग्य तपासणी व औषधोपचार, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया समुपदेशन, मासिक पाळी समस्य, ऍनिमिया आदी आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
शनिवारी आणि रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर होईल. चिखली-मोरेवस्ती परिसरातील महिला आणि नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष यश साने यांनी केले आहे.