आम्हाला घाबरायचे नाही, लढायचे आहे
शबनम न्यूज | मुंबई (दि.११ डिसेंबर) :- राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांनी आपल्या घरी इडी अथवा इतर केंद्रीय तपास यंत्रणांची धाड पडणार असल्याचे सूचक ट्वीट केले आहे.
नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’मित्रांनो, मी ऐकले आहे की आज उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो. घाबरणे म्हणजे रोज मरणे, आम्हाला घाबरायचे नाही, लढायचे आहे. गांधी गोर्यांशी लढले, आम्ही चोरांशी लढू.’
साथियों, सुना है, मेरे घर आज कल मे सरकारी मेहमान आने वाले है, हम उनका स्वागत करते है.
डरना मतलब रोज रोज मरना, हमे डरना नहीं, लड़ना है,
गांधी लड़े थे गोरों से, हम लड़ेंगे चोरों से.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 10, 2021
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर मलिकांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा वर्षाव केला होता. त्यामुळे नवाब मलिकांवर ईडीची धाड पडणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत होती. त्यातच आता नवाब मलिकांच्या ट्विटमुळे असं वाटतंय ही शक्यता खरी ठरू शकते.
म्हणून, नवाब मलिक आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की,’मित्रांनो, मी ऐकले आहे की आज उद्या माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, आम्ही त्यांचे स्वागत करतो.