शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड (दि.२३ डिसेंबर) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा कला विकास प्रकल्प कबड्डी संघाची कु.प्रतीक्षा काळूराम लांडगे हिची दिनांक २८/ १२/ २०२१ पासून हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय किशोरी गट कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पाथरी, परभणी येथे संपन्न झालेल्या किशोर गट राज्यस्तर निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पुणे जिल्हा कबड्डी संघाने उपविजेतेपद पटकाविले .सदर संघात कीर्ती कडगंची, श्रावणी सावंत यांनी पिंपरी-चिंचवडचे प्रतिनिधित्व केले आहे.
सदर निवड चाचणी स्पर्धेतून कु. प्रतिक्षा लांडगेची राष्ट्रीय स्पर्धेच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली असून आहे. तिच्या या यशाबद्दल पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुषमा शिंदे, श्रीमती अनिता केदारी क्रीडा अधिकारी, श्री विश्वास गेंगजे क्रीडा पर्यवेक्षक,श्री अनिल मगर,क्रीडा पर्यवेक्षक, श्री चंद्रशेखर कदम मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव, श्री रामेश्वर पवार पर्यवेक्षक, श्रीमती सोनाली जाधव या सर्वांनी अभिनंदन केले आहे. सदर खेळाडूला श्री आटवे यांनी मार्गदर्शन केले आहे.