शबनम न्यूज : मावळ (दि.०९ जानेवारी) :- आंदर मावळमधील अति दूर्गम गाव असलेल्या कुसवली येथे नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम संपन्न झाला.
पिंपरी चिंचवडमधील प्रसिध्द होमिओपॅथिक तज्ञ डाॅ कामाक्षी शिरोडे यांच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले.
कुसवली गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आदी मिळून सुमारे ९७ जणांची यावेळी आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. या प्रसंगी गावातील अनाथ-निराधारांसाठी असलेल्या सहारा वृध्दाश्रमातील आजी आजोबांचीही तपासणी करण्यात आली. कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते यांनी डाॅ शिरोडे व त्यांच्या पथकाचे स्वागत केले.
Advertisement
Advertisement