शबनम न्यूज : पुणे (दि.१२ जानेवारी) :- दत्तोपासक कै.ताई घाणेकर स्मृतीमंच तर्फे कै.ताई घाणेकर यांच्या १११ व्या जयंतीनिमित्त,विशेष दिव्यांगांसाठी योगदान देणा-या ११ समाजमातांना संस्थापक अध्यक्ष डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते;राष्ट्रगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अध्यक्षपदी पुणे महापालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ.माधुरी सहस्त्रबुद्धे होत्या.
याप्रसंगी कार्याध्यक्षा श्रीमती सुलभा सोवनी, उपाध्यक्षा सौ.मेघना घाणेकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि साहित्यिक मंदाताई नाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्या आणि कलावंत प्रिया दामले आदि मान्यवर उपस्थित होते. सुप्रसिद्ध राष्ट्रीय शिल्पकार राम पारखी,समर्पण संस्थेच्या सहसचिव प्रतिमा अरुण काळे,वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.नागेश हुलावळे या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सौ.माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रारंभी तन्मयी घाणेकर भिडे यांनी ईशस्तवन सादर केले.डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित ‘निवडक डहाळी ‘ अनितकालिक pdf तसेच, कै.ताई घाणेकर यांचा पणतू चि.आर्य थत्ते याच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ॲस्ट्राॅनाॅमिकल कॅलेंडर-२०२२ याचे प्रकाशन सौ.सहस्त्रबुध्दे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.जो आईवर मनापासून प्रेम करतो तोच सा-या जगावर प्रेम करु शकतो असे प्रतिपादन, दत्तोपासक कै.ताई घाणेकर यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकताना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
राष्ट्रहितासाठी प्रत्येकाने आपले योगदान वाढवावे,श्रावणबाळासारखी आई वडिलांची सेवा करावी असे आवाहन सौ.माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले .याप्रसंगी मंदाताई नाईक, प्रिया दामले आदिंची भाषणे झाली.युगप्रवर्तक विवेकानंद-प्रेरणादायी विचार व प्रसंग या विषयावर सौ.ऋचा घाणेकर थत्ते यांचे विशेष व्याख्यानही या कार्यक्रमात झाले.
सौ.मेघना घाणेकर यांनी प्रास्ताविक आणि संयोजन केले सौ.प्रतिमा काळे यांनी आभार मानले. प्रा.नागेश हुलावळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रिया दामले,शिवानी सुतार,ज्योती बोरुडे,दीपाली चव्हाण,मयुरी वाघमारे,वंदना पराडकर,शुभांगी ढगे,मीरा आबनावे,शोभना तीर्धाली,मंगला जोगळेकर,आशा रेवणकर या ११ समाजमातांनाविश्वमहात्मा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते राष्ट्रगौरव पुरस्कार जाहिररित्या प्रदान करण्यात आला.संस्थेतर्फे हा २४वा वार्षिक राष्ट्रगौरव पुरस्कार वितरण सोहळा होता, तसेचआत्तापर्यंत समाजातील सुमारे ५०० नामवंतांना गौरवण्यात आले असल्याचे डाॅ.घाणेकर यांनी सांगितले.सौ.मेघना मधुसूदन घाणेकर,उपाध्यक्षा दत्तोपासक कै.ताई घाणेकर स्मृतिमंच समारंभ अध्यक्षा ज्येष्ठ नगरसेविका सौ.माधुरी सहस्त्रबुद्धे आणि अन्य मान्यवरांचा सन्मान डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.