यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस तर्फे आयोजित वेबिनारमध्ये तज्ज्ञांचे मत
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१३ फेब्रुवारी) :- युवा वर्गात एथिकल हॅकिंगबद्दल जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे असे मत प्रिस्टीन इन्फोसोल्युशन प्रा.लिचे प्रसिद्ध सायबर तज्ञ् रिझवान शेख यांनी व्यक्त केले.
यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) तर्फे आयोजित वेबिनारमध्ये ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सध्याच्या डिजिटल जगात इंटरनेट आणि डिजिटल उपकरणे वापरताना सामान्य व्यक्तींना भेडसावणाऱ्या संभाव्य जोखमीवर एथिकल हॅकिंग द्वारे उपाययोजना करता येऊ शकतात. कॉम्प्युटर,लॅपटॉप व मोबाईल यायाद्वारे आपण प्रत्येक जण महत्वाचा डाटा तयार करत असतो. या डाटामधील महत्वाच्या व गोपनीय माहितीचा कुणीही गैरवापर करू नये यासाठी या एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून खबरदारीच्या उपाययोजना करता येऊ शकतात.एथिकल हॅकिंग वापरातील सिस्टिम्स मधील उणिवा शोधून कार्यप्रणाली अधिक वेगवान व दोषरहित करता येते असे रिझवान शेख यांनी सांगितले.
या वेबिनारचे प्रास्ताविक आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी देवरे या विद्यार्थिनीने तर वेबिनारचे समन्वयक म्हणून प्रा. प्रशांत वाडकर यांनी काम पाहिले. या वेबिनार मध्ये एमबीए व एमसीएचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता.