शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.महापौर,विद्यमान नगरसेवक नितीनआप्पा काळजे यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रभाग क्र. ३ वडमुखवाडी येथील जलतरण तलाव आणि च-होली येथील वाघेश्वर महाराज उद्यान व क्रिडा संकुल, बुर्डेवस्ती पाण्याची टाकी लोकार्पण आमदार महेशदादा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रभागातील भाजप नगरसेविका सौ सुवर्णा विकास बुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी दहा वाजता संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलावाचे वडमुखवाडी येथे उद्घाटन संपन्न झाले तसेच श्री वाघेश्वर महाराज उद्यान चे उद्घाटन सकाळी १०:१५ वाजता संपन्न झाले त्याचप्रमाणे इंद्रायणी धाम येथे सकाळी १०.३० वाजता उद्घाटन संपन्न झाले. त्याचप्रमाणे जलकुंभ २० दशलक्ष लिटर बुर्डेवस्ती पाण्याची टाकी चे भूमिपूजन १०:४५ वा प्राईड सिटी टाकीचे भूमिपूजन सकाळी ११ वाजता महापौरांच्या हस्ते झाले. तसेच सकाळी ११:१५ वाजता श्री वाघेश्वर महाराज क्रिडासंकुलाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते संपन्न झाले. सदरचे उद्घाटन प्रभाग क्रमांक ३ मधील सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नातून करण्यात आले. सर्व विकास कामांचे लोकार्पण भूमिपूजन प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
वाघेश्वर महाराज उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक, सुसज्ज पार्किंग व्यवस्था, स्त्री- पुरुष स्वतंत्र स्वच्छतागृह आदींचा समावेश आहे. वडमुखवाडी येथे उभारण्यात आलेला जलतरण तलाव २५ मी. लांब, १६ मी. रुंद व २.१ मी. खोली असून संपूर्ण तलाव आच्छादित आहे. याकामासाठी र.रु. ६ कोटी ४७ लाख इतका खर्च आलेला असून यामुळे चऱ्होली व आजूबाजूच्या भागातील नागरिकांना याचा वापर करण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक ३ मध्ये नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. नागरिकांच्या सर्वसामान्य सोयीसुविधा यांना प्रथम प्राधान्य देईल, नगरसेविका सुवर्णा बुर्डे यांनी प्रभागाच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलला आहे, त्याचीच प्रचिती या लोकार्पण व भूमिपूजनाच्या सोहळ्यात दिसून आली.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, श्री नितीनआप्पा काळजे, माजी महापौर वि.नगरसेवक सौ सुवर्णा विकास आण्णा बुर्डे,नगरसदस्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका समस्त ग्रामस्थ च-होली बु वडमुखवाडी चोविसावाडी आदी उपस्थित होते.