शबनम न्यूज : पुणे (दि.२७ मार्च) :- नॅशनल लायब्ररी वांद्रे आणि वर्ल्ड व्हिजन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले रात्रशाळा राज्यस्तरीय साहित्य स्पर्धेचे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये संपूर्ण विश्वातुन सुमारे १५५ साहित्यिकांनी आपल्या स्वरचित काव्यरचना पाठवल्या होत्या. हि स्पर्धा दि. १ फेब्रुवारी २०२२ ते १५ फेब्रुवारी २०२२ ह्या कालावधीत आयोजित करण्यात आली होती .
सदर स्पर्धेसाठी
१) मराठी भाषा संवर्धन
२) स्वातंत्र्यवीर सावरकर
३) स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय
असे विषय दिले होते. सदर स्पर्धेच्या कवितांचे परिक्षण विश्व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी केले .
परिक्षक विश्व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, जेष्ठ साहित्यिक डॉ योगेश जोशी, नॅशनल लायब्ररी वांद्रे, चे मान. प्रमोद महाडिक आणि वर्ल्ड व्हिजनचे संस्थापक / अध्यक्ष श्री . नागेश हुलवळे, सावित्रीबाई फुले रात्रशाळा साहित्य प्रतिष्ठानच्या वतीने सर्व विजेते साहित्यिकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे आणि विजेत्यांसह सर्व सहभागी स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : –
मराठी भाषा संवर्धन
प्रथम क्रमांक
माझी मराठी आई – बाबा ठाकूर , पूणे
द्वितीय क्रमांक
माय मराठी – चंद्रशेखर धर्माधिकारी, पूणे
तृतीय क्रमांक
जागर माय मराठीचा करुया – सौ.रंजना खेडकर- नागपूर
उत्तेजनार्थ
अक्षर – अशोक सोनवणे, चिंचवड
मायबोली – सौ.भाग्यश्री निलेश कुलकर्णी , पूणे
स्वातंत्र्यवीर सावरकर
प्रथम क्रमांक
सावरकर नीति – सौ.प्रतिमा महाजन, बेळगाव
द्वितीय क्रमांक
देशभक्त सावरकर – चंदा वाडकर, पूणे
तृतीय क्रमांक
स्वातंत्र्यवीर सावरकर – रविंद्र सोनवणी, टिटवाळा
उत्तेजनार्थ
स्वातंत्र्यपूर्व सावरकर – डाॅ.वैभव जगन्नाथ लोखंडे, ठाणे
सावरकर – सौ.अलका माईणकर, अकोला
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय
प्रथम क्रमांक
छत्रपती शिवाजी महाराज – शिवशंभूव्याख्याते बालाजी काशिद , पूणे
द्वितीय क्रमांक
पाळणा शिवाजी महाराजांचा – सौ.वृषाली संतोष होगाडे, इचलकरंजी
तृतीय क्रमांक
स्वराज्य – अरुण कांबळे, थेरगाव
उत्तेजनार्थ
राजे – सौ.भाग्यश्री राजेश बागड, गुजरात
पुन्हा न होणे ऐसा छत्रपती – प्रज्ञा नरेंद्र करंदीकर , बंगलूरू
सदर स्पर्धा आयोजित करण्यासाठी नॅशनल लायब्ररी वांद्रेचे विश्वस्त मान. प्रमोद महाडिक यांचे मार्गदर्शन लाभले . तसेच बांद्रा नाईट हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री. सर्जेराव पाटील, वर्ड व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष आणि रात्रशाळा शिक्षक श्री. नागेश हुलवळे , पुण्याच्या साहित्यिका प्रतिमा काळे, हैद्राबादच्या कवियित्री राजश्री वाणी-मराठे , औरगांबादच्या सुप्रसिद्ध काव्यरचनाकार सुनिता कपाळे, अहमदनगरच्या लेखिका चंदन तरवडे, सावित्रीबाई फुले रात्रशाळा साहित्य प्रतिष्ठानचे प्राचार्य सुनिल पाटील, नंदकुमार सातपुते सर, दतात्रय सानवणे सर आणि महाराष्ट्रातील सर्व रात्रशाळा मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अनमोल सहकार्य केले .