गजाला सय्यद
महाविद्यालयात शिवस्वराज्य दिनानिमित्त निबंध स्पर्धा संपन्न
शबनम न्युज | औंध
रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात , इतिहास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने ६ जून ‘शिव स्वराज्य दिन’ विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण आंधळे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच शिवस्वराज्य दिनानिमित्त महाविद्यालयात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये १२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
तसेच राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सातारा येथे शिव स्वराज्य दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये उच्च शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील आदी मान्यवरांनी शिवचरित्र व राज्याभिषेकाचे महत्त्व आपल्या भाषणातून मांडले. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील प्राचार्य अरुण आंधळे व अध्यापक, अध्यापकेत्तर, कर्मचारी, सहभागी विद्यार्थी आदींनी महाविद्यालयाच्या वतीने सहभाग नोंदविला.
महाविद्यालयामध्ये शिव स्वराज्य दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इतिहास विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र रासकर, कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. डॉ. बंडोपंत कांबळे, मराठी विभाग प्रमुख प्रा. अनंत सोनवणे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.सुशील कुमार गुजर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. रेश्मा दिवेकर यांनी परिश्रम घेतले.