आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
Advertisement
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली झाली आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी याबाबतचा आदेश आज (दि.१६) रोजी जारी केला आहे. राजेश पाटील यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने दिलेल्या आदेशात आदेशात म्हटले आहे की, श्री.शेखर सिंह शासनाने आपली नियुक्ती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त या पदावर राजेश पाटील (भाप्रसे) यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनात करून केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार श्री. पाटील यांच्याकडून त्वरित स्वीकारावा.
Advertisement