शबनम न्युज | पुणे
झी एंटरटेनमेंट इंटरप्रायजेस लिमिटेडच्या ‘उंच माझा झोका ‘ पुरस्काराने तेर पॉलिसी सेंटर (पुणे)च्या संस्थापक डॉ. विनिता आपटे यांना सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मुंबई येथे शानदार समारंभात ‘अनुवेद’च्या संचालक अनुराधा बन्सल आणि अभिनेत्री दीपा परब यांच्या हस्ते देण्यात आला.
पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संवर्धन ,जनजागृती आणि वृक्षारोपण क्षेत्रात तेर पॉलिसी सेंटर कार्यरत आहे . दीड लाखाहून अधिक वृक्ष संस्थेने लावले असून शहरी भागात नागरी वन यशस्वीरित्या उभारले आहे.डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप ,ग्रीन ऑलिम्पियाड ,एन्व्हायरॉ थॉन,पर्यावरण पत्रकारिता पुरस्कार असे अनेक उपक्रम संस्थेतर्फे यशस्वीरित्या आयोजित केले जातात.
‘उंच माझा झोका’ पुरस्काराचे यंदाचं हे आठवे वर्ष आहे.आपल्या कार्याने समाजाला वैचारिकरित्या सुदृढ,समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात आला. ‘उंच माझा झोका’ पुरस्कार सोहळा २८ ऑगस्ट रोजी प्रसारित केला जाणार आहे.